लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक रिलीज, फोटो व्हायरल

मुंबईतील नवासाचा मानला जाणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविका दूरदूरून येतात. याच लालबागच्या राजाचं रूप आज जाहीर करण्यात आलंय.

Updated: Aug 21, 2017, 11:38 PM IST
लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक रिलीज, फोटो व्हायरल title=

मुंबई : मुंबईतील नवासाचा मानला जाणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविका दूरदूरून येतात. याच लालबागच्या राजाचं रूप आज जाहीर करण्यात आलंय.

नेहमीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं रूप कसं असेल याची उत्सुकता भाविकांमध्ये लागली होती. अखेर राजाचं दर्शन झालं आणि सोशल मीडियात फोटो व्हायरल झाला

लालबागच्या राजाचं रूप दरवर्षी नवनवीन असतं. दरवर्षी याची उत्सुकता लागलेली असते की, यावर्षी काय असणार. त्यानुसार यंदाही उत्सुकता होती. अखेर सोमवारी रात्री लालबागच्या राजाचे दर्शन करवण्यात आले. येत्या काही दिवसांतच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होणार आहे.