बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग, काही जण अडकले

कमला मिलमधील 'मोजो बिस्ट्रो' प्रकरणाची 'आग' अजून नीट विझलीही नाही तोवरच बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग लागल्याचं समजतंय. 

Updated: Jan 5, 2018, 02:09 PM IST
बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग, काही जण अडकले  title=

मुंबई : कमला मिलमधील 'मोजो बिस्ट्रो' प्रकरणाची 'आग' अजून नीट विझलीही नाही तोवरच बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग लागल्याचं समजतंय. 

गुरुवारी दुपारी १२.३० वाजल्याच्या सुमारास जिया नावाच्या इमारतीच्या तळ मजल्यावरील गोडाऊनला ही आग लागलीय. अंजुमन गर्ल्स स्कूलजवळ जिया इमारत आहे.  

अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. 

इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणारी लोक पेटलेल्या इमारतीत अडकल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. 

अधिक माहिती थोड्याच वेळात...