सीएसएमटी स्थानकावर एक्सप्रेसच्या 3 डब्यांना आग

सीएसएमटी स्थानक परिसरात धूरच धूर

Updated: May 29, 2018, 03:51 PM IST
सीएसएमटी स्थानकावर एक्सप्रेसच्या 3 डब्यांना आग title=

मुंबई : सीएसटी रेल्वे स्टेशनवर आग लागल्याची बातमी समोर येत आहे. फलाट क्रमांक 18 वर उभ्या असलेल्या एक्सप्रेसच्या 3 बोगीला आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशनम दलाचे जवान करत आहेत. सुदैवाने या डब्यात कोणीच नव्हतं. स्टेशन परिसरात सध्या धुरच धुर दिसत आहे.