Shahrukh च्या बंगल्याला धोका? 'मन्नत' बंगल्या जवळील इमारतीला भीषण आग

ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Updated: May 9, 2022, 09:57 PM IST
Shahrukh च्या बंगल्याला धोका? 'मन्नत' बंगल्या जवळील इमारतीला भीषण आग title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे घर असलेल्या वांद्रे येथील मन्नत घराजवळील इमारतीला आग लागली. इमारतीच्या 14 व्या मजल्याला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी हजर होत्या ज्या ही आग विझवण्याच्या प्रयत्नात होत्या. अनेक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. ही आग सेलिब्रिटी राहात असलेल्या भागात लागल्यामुळे बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे.

ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण व्हिडीओमध्ये तुम्ही आगीच्या झळा तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. ज्यानंतर या आगीच्या झळा अग्निशामक दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.

शाहरुख खानच्या घराजवळ आग

शाहरुख खान मुंबईतील वांद्रे या भागात राहतो. विशेष म्हणजे ही आग किंग खानच्या अगदी जवळ असलेल्या जीवेश बिल्डिंगच्या 14व्या मजल्यावर लागली होती.

या आगीत कोणी जखमी झालंय का? किंवा कोणती जीवीत हानी झालेली नाही ना, हे अद्याप कळू शकलेलं नाही.