मुंबई : धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांनी दणका दिलाय.
नानावटी रूग्णालयाच्या विश्वस्तांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एका महिन्याच्या आत पाच लाख रूपये भरण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे ही रक्कम टृस्टच्या खात्यातून न भरता विश्वस्तांनी स्वत:च्या खिशातून भरून त्या पावतीची प्रत धर्मादाय आयुक्त कार्यालयात जमा करण्यास सांगितली आहे
- १२ सप्टेंबर २०१७ - नानावटी रुग्णालयात धर्मादाय आयुक्तांची अचानक भेट
- ट्रस्टच्या रुग्णालयात १० टक्के जागा गरीबांसाठी राखीव ठेवत, गरीबांवर मोफत उपचार करणे बंधनकारक
- नानावटी रुग्णालायात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी केलं होतं उघड
- याप्रकरणी रुग्णालयाने प्रसार माध्यमांकडे खुलासा पाठवत निर्माण केला संभ्रम
- संभ्रम निर्माण करून रुग्णालायाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अवमान केल्याचा ठपका
- कारणे दाखवा नोटीशीनंतर नानावटी रुग्णालायाची धर्मादाय आयुक्तांकडे माफी
- नानावटी रुग्णालय विश्वस्तांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ लाख रुपये जमा करण्याचे आयुक्तांचे आदेश