Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?, आज फैसला

Political News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.  आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.  

Updated: Nov 9, 2022, 08:36 AM IST
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?, आज फैसला title=

Maharashtra  Political News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. (Pravin Raut Property confiscated by ED)आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात दिवाळीआधी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर जवळपास चार दिवस दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला आहे. 

ईडीनं (ED) जामिनाला विरोध करताना संजय राऊत हे प्रभावशाली व्यक्ती असून ते बाहेर पडल्यावर साक्षीदारांवर दबाव आणतील, अशी भीती व्यक्त केली आहे. तर प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना पैसे दिल्याचा कुठलाही पुरावा ईडीनेने सादर केलेला नाही, असा दावा राऊतांचे वकील प्रदीप मुंदरगी यांनी केला आहे. शेवटच्या सुनावणीवेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता, आज तो निकाल येण्याची शक्यता आहे. 

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) प्रकरणी आज 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केले. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी म्हणजे आज न्यायालय निर्णय देणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरण खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत हे दोघेही न्यायलयीन कोठडीत आहेत 

दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे संजय राऊत न्यायलयीन कोठडीत आहेत. तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने 30 जून 2022 रोजी अटक केली होती. तेव्हा त्यांना ईडी कोठडी ठेवण्यात आले होते. तर, 8 ऑगस्ट रोजी पीएमएलए कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे खासदार राऊत यांना आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. तर, 7 सप्टेंबरला त्यांनी पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.