मुंबई : नो पार्किंगमधील गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन आणि पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणा-या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केली. मात्र त्यानंतर त्यांची मस्ती उतरून चक्क ढसाढसा रडायला लागले.
मीरारोडमध्ये गुरुवारी घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ समोर आलेत.वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रात मोटार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला. लगेचच तिथल्याच एका दुकानातून अरुण सिंग आणि त्याची पत्नी मीना बाहेर आले.
गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाट्टेल तश्या धमक्या, शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तमाशा करू लागले. त्यानंतर पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं. रस्त्यावर हिरोगिरी करणा-या अरुणला अटक करताच तो ढसाढसा रडू लागला. त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचे व्हिडिओ आपण पाहू शकताय. गुन्हा दाखल होताच पोलिसांना गयावया करून दोघेही नवरा - बायको माफी मागून पुन्हा असे करणार नाही म्हणून विनवण्या करत होते.