मुंबई : सरकारनं शुल्क वाढ करण्यास मंजुरी दिली नाही, म्हणून खासजी मेडिकल कॉलेजेसनं आडमुठी भूमिका घेत थेट कॉलेजेच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल आणि डेंटल कॉलेजेसनं घेतलेल्या या निर्णयामुळं राज्यातल्या तब्बल १५ कॉलेजेस बंद करण्यात येणार आहेत. यामुळं एमबीबीएसच्या पंधराशे आणि डेंटलच्या तब्बल ७०० जागा बाद होणार आहेत.
खासगी मेडिकल कॉलेजेसच्या या भूमिकेमुळं विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मोठी अडचण निर्माण होणार आहे. आता सरकार या खासगी कॉलेजेसच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय.