मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मुंबईतील बांद्रा ताज लँडस अँड हॉटेलमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ साठा तर मुख्य स्टोरेज कक्षात झुरळांचा प्रादुर्भाव असल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे . या तपासणीमध्ये अन्न साठवण्याच्या काही फ्रीजवर तापमान निदर्शक यंत्रणा आढळून आली नाही शिवाय, यामध्ये अमूल चीज बटर, लेमन ज्यूस, इडली बॅटर, फ्रुट पुरी, ग्रीन एप्पल इत्यादी पदार्थांचा मुदतबाह्य साठा म्हणजेत एक्सपायरी डेट असलेला अन्नपदार्थचा साठा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी साठवून ठेवल्याचे समोर आले आहे.
मुदतबाह्य अन्नपदार्थ साठा नष्ट करण्यात आला असून अन्नसुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
देशातील प्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेल ताज लँड्सवर ३ मार्चला एफडीएने धाड टाकून कारवाई केली. अशा प्रकारे मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये एक्सपायरी फूड आणि किचनमध्ये झुरळ आढळल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.