मोठी बातमी : IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, पण जास्त दिवस नाही!

IT रिटर्न तुम्ही भरला नसले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अजुनही संधी गेलेली नाही. सरकारने IT रिटर्न भरण्यासाठी (IT returns) मुदतवाढ दिली आहे. 

Updated: Dec 31, 2020, 09:45 AM IST
मोठी बातमी : IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, पण जास्त दिवस नाही!  title=
संग्रहित छाया

मुंबई : IT रिटर्न तुम्ही भरला नसले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अजुनही संधी गेलेली नाही. सरकारने IT रिटर्न भरण्यासाठी (IT returns) मुदतवाढ दिली आहे. (Extension of ITR Filing Last Date) कारण आयकर परतावा भरण्यास ३१ डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

सरकारने IT रिटर्नसाठी मुदतवाढ ( ITR Filing) दिली असली तरी तिचा कालावधी कमी आहे. त्यामुळे IT रिटर्न भरला नसेल तर तात्काळ भरा अन्यथा तुम्हाला नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ केवळ १२ दिवसांसाठी देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने याबाबत घोषणा केली आहे.

तसेच ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना आणि त्यांच्या पार्टनरसाठी २०२०-२१चा आयकर भरण्यासाठी १५फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. तर जीएसटी भरण्यासही २८ फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१९-२० (असेसमेंट वर्ष २०२०-२१) मध्ये जवळपास ४३.७ दशलक्ष आयटी रिटर्न २८ डिसेंबरपर्यंच दाखल झाल्याचे आयकर विभागाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. 

कोरोना कहरामुळे केंद्र सरकारने विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. वेळेत विवरणपत्रे दाखल न केल्यास अधिक उत्पन्न असलेल्यांना दंड भरावा लागणार होता. मात्र, आजच्या आर्थिक व्यवहारांची दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे विवरणपत्रे सादर करण्यासाठी सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ४० टक्के व्यापारी व मध्यम उद्योजकांनी केली होती. मात्र, केंद्राने केवळ १० दिवसच वाढ दिली आहे. तसेच ज्यांना ऑडीट करायचे असेल त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देत दिलासा मिळाला आहे.