सत्तास्थापन झालं, आता मंत्रिपदाचा तिढा, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये चढाओढ

नव्या सरकारमध्ये खातेवाटपावरुन मोठी चढाओढ, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच

Updated: Jul 2, 2022, 04:12 PM IST
सत्तास्थापन झालं, आता मंत्रिपदाचा तिढा, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये चढाओढ  title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : खातेवाटपावरून आता भाजप आणि शिंदे गट यांची चढाओढ सुरू झाली. गृह आणि अर्थ खातं स्वतःकडेच ठेवण्यावर एकनाथ शिंदें आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाला गृह आणि अर्थ या महत्त्वाच्या खात्यांसह महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवायची आहेत. 

गृहखातं आणि अर्थ खात्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचा आग्रह आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः गृहखात्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता या पेचावर कसा तोडगा काढणार याची उत्सुकता आहे.

 शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट फॉम्युर्ला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एनसीपी - काँग्रेस पक्षाकडे असणारी बहुतेक खाती भाजपाकडे असणार अशी माहिती मिळाली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यंमंत्रीपद असलं तरी भाजपाकडे सगळ्यात महत्त्वाची खाती असणार आहेत. भाजपाकडे गृह, महसूल, उर्जा, जलसंपदा सारखी महत्वाची खाती राहण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील आमदारांना गृहखातं हवं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खातेवाटपावरून चढाओढ सुरू झाली आहे. 

शिंदे समर्थक गटाकडे ग्रामविकास, जलसंधारण, शालेय शिक्षण सारखी खाते राहण्याची शक्यता आहे. तर फडणवीस हे स्वतःकडे गृह विभागासह काही अन्य महत्वाची खाते ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.