मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावालाय. शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात स्थगित केलेल्या आरे मेट्रो कारशेडलाही हिरवा कंदील दिला. एका बाजूला शिंदे सरकार सटासट निर्णय घेतंय. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगितीही देतंय. (eknath shinde fadnavis government has stopped to former minister dhananjay munde social justice department work)
शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील मंत्री राहिलेल्या अजित पवार, भुजबळ, जयंत पाटलांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना दणका दिलाय. शिंदे सरकारने माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का दिलाय.
मुंडेंच्या काळातील सामाजिक न्याय खात्याच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने 1 एप्रिलनंतरच्या सगळ्या कामांना स्थगिती दिली आहे. आता नव्यानं पालकमंत्री नियुक्त झाल्यावर कामांचं अवलोकन केलं जाईल. मात्र मुंडेंनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिल्याचं परिपत्रकच शिंदे सरकारनं काढलंय.