Mumbai BMC: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाला आणखी एक जबर धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता तिहेरी रणनिती आखली आहे. मराठी आणि अमराठी मतांवर भाजप (BJP) लक्ष केंद्रीत करणार आहे. तर एकनाथ शिंदे गट (Eknath Shide) धनुष्यबाणासाठी भक्कमपणे कायदेशीर बाजू मांडणार आहे. (Eknath shinde devendra fadnavis makes plan for upcoming Mumbai bmc elections read details)
शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचीच असल्याचं पटवून देण्यासाठी यावेळी प्रयत्न होणार आहेत. त्याचवेळी मनसेसोबत युतीही तूर्तास टाळण्यात आली आहे. असं असलं तरीही (Congress)काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP), शिवसेनेचा समाचार घेण्याचं मनसेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात आलं आहे. थोडक्यात मनसेला (MNS) अदृश्य हातांची मदत कशी होईल याची रणनिती आखण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुका अनेक कारणांनी महत्त्वाच्या असणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळणार असल्याचं चित्र आता स्पष्टपणे पाहायला मिलत आहे. पण, दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला घरी बसवत एकत्र आलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्येही नाही म्हटलं तरी फोडाफोडीच्या राजकारणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.