'शिंदे सरकार केव्हाही कोसळू शकतं', माजी भाजप नेत्याचं मोठं भाकीत

देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार आल्यानंतर हे सरकार कोसळू शकतं असे दावे उद्धव ठाकरे गटातील लोकांनी केले होते

Updated: Jul 30, 2022, 09:44 PM IST
'शिंदे सरकार केव्हाही कोसळू शकतं', माजी भाजप नेत्याचं मोठं भाकीत title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिंदे यांचं सरकार (Eknath Shinde) आल्यानंतर हे सरकार कोसळू शकतं असे दावे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील लोकांनी केले होते. संजय राऊत यांनी देखील सडकून टीका केली होती. आता माजी भाजपच्या नेत्यानेच हे सरकार कधीही कोसळेल असं भाकीत केलं आहे. 

शिंदे सरकार केव्हाही कोसळू शकतं असं भाकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. या सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारवर टांगती तलवार आहे.

शिंदे फडणवीस सरकारला एक महिना पूर्ण झाला पण, अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. शेतकरी संकटात आहे मात्र ही सगळी लोकं सत्कार स्वीकारण्यात व्यस्त आहे.

शक्ती प्रदर्शनात व्यस्त आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जावं त्यांचे दुःख समजून घ्यावे. मात्र हे न करता फक्त आनंद उत्सव साजरा होत असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली.