मुंबई : आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत.
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने ही मोठी कारवाई केलेली आहे. कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, वांद्रे कुर्ला संकुलातील एक मालमत्ता आणि जमिनीची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.
कालच इक्बाल कासकरच्या निकटवर्तीच्या एका महिलेचा ठाण्यातील 55 लाखांचा फ्लॅट ईडीने जप्त केला होता. त्यानंतर आज नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असणाऱ्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. ईडीने नवाब मलिक यांच्याशी संबंधीत आठ मालमत्ता जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा व्यवहार नवाब मलिक यांनी कुख्यात डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरशी संबंधित असल्याचा आरोप ईडीने केला होता. त्याच आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.
नवाब मलिक यांची कोणती संपत्ती जप्त?
कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड
कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स
वांद्रे पश्चिमेतील 2 फ्लॅट
उस्मानाबादमधील मलिकांची 147 एकर जमीन
नवाब मलिक यांच्याकडून सुप्रिम कोर्टात याचिका
न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी ईडी कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.