Anil Parab ED: अनिल परब यांचे टेन्शन वाढणारी बातमी, जमीन खरेदी विक्रीची कागदपत्रं ईडीच्या हाती

साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.  कारण ईडीनं साई रिसॉर्टशी संबंधित कागदपत्रांची कसून छाननी सुरू केली आहे. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचे सर्व दस्तावेज ईडीच्या हाती लागले आहेत.

Updated: Jan 6, 2023, 12:06 AM IST
Anil Parab ED: अनिल परब यांचे टेन्शन वाढणारी बातमी, जमीन खरेदी विक्रीची कागदपत्रं ईडीच्या हाती  title=

Anil Parab ED: ठाकरे गटाचे माजी मंत्री  शिवसेना नेते  अनिल परब (Anil Parab)  यांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची करावाई केली. यानंतर आता अनिल परब यांचे टेन्शन वाढणारी घडामोड घडली आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी(Sai Resort in Dapoli) अनिल परब यांच्याशी संबधीत जमीन खरेदी विक्रीची कागदपत्रं ईडीच्या हाती लागली आहेत. 

साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.  कारण ईडीनं साई रिसॉर्टशी संबंधित कागदपत्रांची कसून छाननी सुरू केली आहे. जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचे सर्व दस्तावेज ईडीच्या हाती लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून शोध घेतल्यानंतर मुरूड ग्रामपंचायतीमधील दस्तावेज ईडीनं आपल्या ताब्यात घेतले आहेत. जागेच्या सर्वच बाबी तपासण्यासाठी ईडी अॅक्शनमोडमध्ये आल्यामुळे परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

अनिल परब यांची 10 कोटी 20 लाखांची ही संपत्ती जप्त

अनिल परबांशी संबंधित संपत्ती ईडीनं जप्त केली होती. 10 कोटी 20 लाखांची ही संपत्ती असून अनिल परब, साई रिसॉर्ट आणि इतरांशी संबंधित असलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती  ईडीनं ट्विट करून दिली होती. दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. अनिल परब यांनी 2018 च्या विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात रिसॉर्टचा उल्लेख केला होता. या रिसॉर्टची घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा सोमय्या यांनी दाखल केला होता. 

वांद्रे येथे अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय 

वांद्रे पूर्व येथील म्हाडा वसाहतीमधील जागेवर असणारे अनिल परब यांचे कार्यालय अधिकृत करण्याबाबत अनिल परब यांच्यावतीने आर्किटेक्ट विशाल परब यांनी म्हाडाकडे अर्ज केला होता. मात्र, म्हाडाने हा अर्ज फेटाळला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या या कार्यालयाबाबत म्हाडा कडे तक्रार केली होती आणि कारवाई करण्याची मागणी केली होती.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी म्हाडाला पत्र लिहिलंय. अनिल परब यांचं वांद्रे पूर्वमधल्या गांधी नगरमध्ये म्हाडाच्या जमिनीवर अनधिकृत कार्यालय आहे. हे अनधिकृत बांधकाम तोडावं, अशी मागणी सोमय्यांनी पत्रामध्ये केलीय. २ सप्टेंबर २०२१ ला  लोकायुक्तांच्या आदेशात  हे कार्यालय पाडण्याचे आदेश दिले होते. पण अजूनपर्यंत हे कार्यालय तोडण्यात आलं नाही. या कार्यालयावर कारवाईची मागणी किरीट सोमय्यांनी केलीय.