प्रताप सरनाईकांना ईडीने चौकशीला बोलावले

११ वाजता ईडी कार्यालयात प्रताप सरनाईकांची चौकशी होणार आहे. 

Updated: Nov 25, 2020, 10:37 AM IST
प्रताप सरनाईकांना ईडीने चौकशीला बोलावले title=

मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल (२४ डिसेंबर) ईडी (ED) ने छापा टाकला होता. त्यांचे पुत्र विहंग यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आज प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलंय. ११ वाजता ईडी कार्यालयात प्रताप सरनाईकांची चौकशी होणार आहे. पण सरनाईक या चौकशीला उपस्थित राहणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

काल इडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. विहंगला ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. काल ईडीकडून विहंगची ६ तास चौकशी झाली. सध्या सरनाईक परीवार मुंबईलाच असल्याची माहिती समोर येतेय. 

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल (२४ डिसेंबर) ईडी (ED) ने छापा टाकला होता. त्यांचे पुत्र विहंग यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आज प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलंय. ११ वाजता ईडी कार्यालयात प्रताप सरनाईकांची चौकशी होणार आहे. पण सरनाईक या चौकशीला उपस्थित राहणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून गेले ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.