लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु - आशिष शेलार

शेतकरी, कारखानदार, महिला, युवक या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभे राहावे ही प्राथमिकता असावी. मात्र, सरकारची प्राथमिकता दुसरीच आहे. सरकारचे डोळे बंद आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

Updated: Feb 25, 2022, 12:59 PM IST
लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु - आशिष शेलार title=

मुंबई : राज्यात अनेक प्रश्न असताना सरकार मात्र एकाच गोष्टीवर काम करतंय ते म्हणजे भ्रष्टाचार. राज्यातल्या महाविकास आघाडीचं सरकारचं वर्णन ते भ्रष्टाचाराचा महामेरू असंच करावं लागेल. भ्रष्टाचार, गुन्हेगार आतंकवाद यावर या सरकारनं लक्ष दिलंय.

२०१४ मध्ये देशात भाजप सरकार आल्यावर या सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावाखाली जनतेला वचन दिलंय. ते म्हणजे "न खाऊंगा, न खाणे दूंगा". त्यानुसार कायद्यात बदल केले गेले आणि आता त्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांची अवस्थता वाढलीय, अशी टीका शेलार यांनी केलीय.

देश आणि महाराष्ट्र आता एका वळणावर उभा आहे. लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु झालीय. यात जनता यशस्वी होईल, जनता जिंकेल. सामान्य जनतेच्या मनातलं रामराज्य येण्याचै प्रक्रिया सुरु झालीय. या साऱ्याची रचना कोअर कमिटीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

विरोधक सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप सातत्याने करताहेत. पण, सूडबुद्धीने कारवाई ठाकरे सरकार करत आहे. केंद्रीय मंत्र्यांना अटक होते, सेनादलाचे कर्मचारी मारहाण करतात, पण कारवाई करत नाहीत. सोमय्या तक्रार द्यायला जात असताना त्यांना रोखले जाते ही सूडबुद्धी आहे.

यंत्रणा आपले काम करत आहे. पदावर बसलेले व्यक्तीनी नियम पाळावे. ज्यांना सूडबु्दधीने कारवाई केली असे वाटते त्यांनी न्यायालय जावे. आघाडी सरकारने "अपने गिरबांन मै झांकिये, सच सामने आयेगा" असा टोलाही त्यांनी लगावला.