Drugs Case: आर्यन खानसह तिघांना किला कोर्टात हजर केले जाणार

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

Updated: Oct 3, 2021, 05:48 PM IST
Drugs Case: आर्यन खानसह तिघांना किला कोर्टात हजर केले जाणार title=

मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. NCB ने आर्यनला क्रूझमध्ये त्याच्या उपस्थितीबद्दल बराच वेळ विचारपूस केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आलीये. आर्यन व्यतिरिक्त त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धोमेचा यांनाही अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह तिघांना किला कोर्टात हजर केले जाणार आहे. आर्यन खानवर ड्रग्सच सेवन करणे आणि ड्रग्स बाळगल्याचा आरोप आहे. एनडीपीएस ऍक्टमधील सेक्शन,8c, 20b, 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यापैकी 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना आता अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने अटक केलेल्या तीन जणांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा समावेश आहे. तर नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांचीही रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. अरबाज मर्चंट आर्यनचा मित्र आहे.

एनसीबीने आर्यनसोबत केलेल्या चौकशीत आर्यनने सांगितले होते की, तो गेस्ट म्हणून पार्टीला पोहोचला होता.