शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग

पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Updated: Jun 7, 2018, 11:06 PM IST
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग  title=

मुंबई : राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला तरी  १० जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार आहे. हा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे १२ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मान्सूनपूर्व वादळी पाऊस

१२ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडेल, अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रात आहे. ढगाळ वातावरण राहणार असल्याने तापमानात घट होईल. परंतु १२ तारखेनंतर पुन्हा तापमान वाढेल.

कोकण मुंबईत मुसळधार

दरम्यान, १० जूनपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे याभागात ८ ते ९ जून यादरम्यान  मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही ९ आणि १० जून रोजी मुसळधार पाऊस असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.