मुंबई : विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागावाटपाची बैठक संपली. उद्या पुन्हा चर्चा होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी उद्या आपली पहिली यादी जाहीर करणार आहे. दरम्यान, अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची प्रदेश अध्यक्ष जयंत पाटल यांनी घोषणा केली आहे. त्याआधी राष्ट्रवादीने बिडमधून चार उमेदवार आधीच जाहीर केले आहेत.
मुंबई शहरातील दहापैकी नऊ जागा काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादीला हा जुनाच फॉर्म्युला काय ठेवण्यात आला आहे. दरम्यान, वडाळा आणि वरळीचा अपवाग वगळता अन्य आठही मतदारसंघातील उमेदवारांची नावे पहिल्या यादीत नक्की करण्यात आली आहेत. वरळीत राष्ट्रवादीकडून कोण असणार तर वडाळ्यातून काँग्रेसकडून कोण याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस आघाडीकडून आमदार वर्षा गायकवाड, अमिन पटेल तर कुलाब्यातून आमदार भाई जगताप, मधु चव्हाण, गणेश यादव, उदय पारसकर, प्रवीण नाईक यांची नावे चर्चेत आहेत. याची नावे पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे.