Shivsena Meeting : आमदारांपाठोपाठ खासदारही नाराज असल्याची चर्चा असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 7 खासदरा गैरहजर होते. दरम्यान या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत खासदारांनी व्यक्त केलं. देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे, आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे असं मतंही खासदारांनी व्यक्त केलं.
भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, शिंदेसोबत गेलेले 50 आमदार हे आजही मनाने आपलेच आहेत, आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे, एकनाथ शिंदे आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार आहे असा सूरही खासदारांचा होता.
राष्ट्रपती निवडणूक चर्चा संपल्यावर काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाशी चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमीका मांडण्यात आली. शिवसेना पक्षाचे निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच ठरवतील तर विधिमंडळातील सत्ताकारण एकनाथ शिंदे ठरवतील,असा पर्यायही पुढे आला आहे.