मुंबई : घाटकोपरमधील हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत. मात्र, उदाणी यांची हत्या का केली, याचा उलगला आता झालाय. उदाणी याला चांगला धडा शिकविण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आलाय. यासाठी पद्धतशीर कट रचण्यात आला. त्यानंतर कटाप्रमाणे सर्व काही घडवून आणण्यात आले. का बदला घेण्याचे ठरले, हे एकाद्या सिनेमातील नाट्यमय घटनेप्रमाणे आहे.
आपल्या मैत्रिणीवर असलेली वाईट नजर कायमची हटविण्यासाठी त्याने रचला एक हत्येचा कट. 28 नोव्हेंबर 2018 पासून बेपत्ता असलेल्या घाटकोपरमधील सोने आणि हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी यांची अपहरण करून हत्या झाली असल्याचा उलगडा झाला. या प्रकरणात भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांचा स्वीय सचिव सचिन पवार याच्या सहभागामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
हिरे व्यापारी उदानी हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कटाला तेव्हा सुरुवात झाली, ज्यावेळी एका पार्टीत राजेश्वर उदाणी याने सचिन पवार याच्या मैत्रिणीबद्दल अश्लील शब्द उच्चारले. त्यानंतर सचिन पवार याने उदाणी याला कायमचा धडा कसा शिकवायचा याचा प्लान तयार करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी 19 नोव्हेंबर रोजी विक्रोळी कोर्टाजवळ दिनेश पवार याच्याशी त्याची भेट झाली आणि सचिनने आपल्या मनातील उदाणीबद्दल असलेला राग व्यक्त केला. त्यानुसार दिनेशने उदाणीचा बदला घेण्यासाठी सचिनला एक प्लान सुचवला.
या प्लाननुसार उदानीला एका फार्म हाऊसवर नेऊन त्याची एका मॉडेलसोबत अश्लील चित्रफीत बनवून त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळणे असा ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे हा कट रचण्यास सचिन पवार आणि दिनेश पवार या दोघांनी माणसांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. ब्युटीशियन असलेल्या सायस्था खान हिला पाच लाखांच्या बदल्यात मॉडेल पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. सायस्था खान हिने जारा खान हिला एका चित्रपटात काम करण्यासाठी नाट्यरूपांतर करायचे आहे असं सांगून तिला या कटात मॉडेलची भूमिका बजावण्याची भूमिका बाजावायची असल्याचे सांगितले.
28 नोव्हेंबर रोजी सचिन पवारने लोखंडवालामध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राची आय ट्वेंटी कार या कटासाठी घेतली. पोलिसांना चकवा देण्यासाठी या कारचा नंबर देखील बदलण्यात आला होता. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सचिन पवार,दिनेश पवार, प्रणित भोईर, महेश भोईर,सारा मोहम्मद खान,सिद्धेश पाटील आणि दोघे विक्रोळी टागोर नगर परिसरात एका रूम वर एकत्र जमले. प्रत्येकाला आपापली भूमिका समजावल्यानंतर सचिन पवार घाटकोपरच्या दिशेने निघून गेला तर दिनेश पवार हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह कळंबोलीच्या दिशेने रिक्षाने निघून गेला.
विक्रोळीतील टागोरनगरमध्येच राजेश्वर भोईर आणि झाराला या आय ट्वेन्टी गाडीत बसविण्यात आलं आणि प्रणित भोईर याने ही गाडी पनवेलच्या दिशेने नेली. कळंबोली जवळ पोहोचताच त्या ठिकाणी दबा धरून बसलेले दिनेश पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गाडीत बसून राजेश्वर उदानी याच्या तोंडावर केक मारला आणि त्यांचा श्वास कोंडे पर्यंत गळा दाबून ठेवला.
पनवेलच्या नेहरे गावाजवळ पोहोचल्यावर या सर्वांनी राजेश्वर उदाने याचा मृतदेह गाडीबाहेर एका झुडपात फेकून दिला. हत्येनंतर जारा खान हिला घेऊन दिनेश पवार मुरुडच्या दिशेने गेला आणि मुरुडमध्ये एका घराजवळ त्याने हत्येत वापरण्यात आलेली कार पार्क केली. तिसऱ्या दिवशी सचिन पवार याने बुक केलेल्या एका इनोव्हा कारमधून हे दोघे पुन्हा मुंबईत परतले.
देवोलीना भट्टाचार्य
या घटनेनंतर सचिन पवार याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे पोलिसांनी सचिन पवार याच्यावर गुप्तपणे पाळत ठेवली होती. हत्या झाल्यानंतर तीन दिवसांनी सचिन पवार हा देवोलीना भट्टाचार्य या अभिनेत्रीसोबत नैनितालला गेला होता त्यावेळी देखील पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. सचिन पवार आणि राजेशवर उदाणी आणि इतरांसोबत झालेले त्याचे कॉल रेकॉर्डस्वरून सचिन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु सचिन पवार याचा अटक केलेल्या आरोपींची कुठचाही संबंध नाही असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
सचिन पवार आणि दिनेश पवार याची भेट ही याच विक्रोळी कोर्टात झाली आणि त्याच ठिकाणी त्याच्या हत्येचा कट देखील रचला गेला. याच हत्येच्या आरोपाखाली सध्या सचिन पवार आणि इतरांवर याच विक्रोळी कोर्टात सध्या खटला सुरू आहे. कुठलाही पुरावा नसताना देखील तांत्रिक माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.