अरे व्वा! धारावीकरांनी सलग सातव्या दिवशी साधली 'ही' किमया

तब्बल आठवडाभर धारावीतील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. 

Updated: Jun 8, 2020, 07:46 PM IST
अरे व्वा! धारावीकरांनी सलग सातव्या दिवशी साधली 'ही' किमया title=

मुंबई: कोरोनाचा Coronavirus हॉटस्पॉट म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला लागल्याची चिन्हे सातत्याने दिसत आहेत. सोमवारी सलग सातव्या दिवशी धारावीत कोरोनाचे २५ हून कमी रुग्ण मिळाले. तसेच तब्बल आठवडाभर धारावीतील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. या सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करायचे झाल्यास धारावीत खरंच कोरोनाची साथ नियंत्रणात येताना दिसत आहे. आज धारावीत कोरोनाचे केवळ १२ नवे रुग्ण मिळाले. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १९२४ इतका झाला आहे. धारावीतील रुग्णांची घटलेली संख्या ही मुंबईच्यादृष्टीने अत्यंत आशादायक बाब मानली जात आहे. 

कोरोनाविषयीच्या सूचना देत फोनवर येणारा 'तो' आवाज कोणाचा माहितीये?

मात्र, आता धारावीपासून काही अंतरावर असणाऱ्या माहीम आणि दादरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. सोमवारी दादरमध्ये १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर माहीम परिसरात १४ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे दादर आणि माहीममधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा अनुक्रमे ४२० आणि ६५१ इतका झाला आहे. 

मोठी बातमी: पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ५० लाखांचे विमाकवच

 

प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न 
धारावीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या भागामध्ये सर्वतोरी यंत्रणा लागू करत प्रशासनाकडून शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय येथून अनेक मजुरांनी आपल्या मुळ गावची वाटही धरली.  प्राथमिक पातळीवर चाचणी करत गरजेनुसार येथील नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. परिणामी या भागातून कोरोना रुग्णांची झपाट्यानं होणारी वाढ बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचं स्पष्ट होत आहे. फक्त प्रशासनच नव्हे, तर अनेर स्वयंसेवी संस्था आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या मंडळींनीसुद्धा या भागामध्ये असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊऩ आणि क्वारंटाईनच्या कालावधीत मोलाची मदत केल्याचे पाहायला मिळाले होते.