धारावीत कोरोनाचे केवळ २ रुग्ण, मुंबईत चाचण्यांचा टप्पा ५ लाखांवर

मुंबईत सर्वाधिक चाचण्या

Updated: Jul 29, 2020, 08:33 PM IST
धारावीत कोरोनाचे केवळ २ रुग्ण, मुंबईत चाचण्यांचा टप्पा ५ लाखांवर  title=

मुंबई : धारावीत कोरोनाचे केवळ २ रूग्ण सापडले असून इथं आता एक्टिव्ह रूग्णांची संख्या ८३ झालीय. तर एकूण रूग्णसंख्या २५४५ झालीय. दादर आणि माहिममध्ये प्रत्येकी २५ रूग्ण वाढले आहेत. दरम्यान मुंबईत आतापर्यंत ५  कोविड चाचण्याचा टप्पा पार झालायं. काल एका दिवसात ११ हजार ६४३ चाचण्या, मुंबईतील आतापर्यंतचा उच्चांक गाठला गेल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आलीय.

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यापेक्षा कमी असून रुग्ण दुप्पटीचा कालावधीदेखील आता सत्तरीपार सक्रिय रुग्णांची संख्याही १८ हजारापेक्षा कमी आहे. 

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.९७ टक्के इतका आहे. १ टक्क्यांहून खाली हा दर आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळालाय. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. 

गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एका दिवसांत करण्यात आलेल्या चाचण्‍यांचा हा उच्चांक आहे. तत्पूर्वी २७ जुलै २०२० रोजीच्या २४ तासांमध्ये देखील ८ हजार ७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या असे पालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.