मुंबई: शहरातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीत शनिवारी आणखी ३३ जणांची COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर संपूर्ण मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५६६ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८८१७ इतका झाला आहे.
मुख्यमंत्र्यांचं कोविड योद्ध्यांना भावनिक पत्र
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. लॉकडाऊनची शक्य तितकी कडक अंमलबजावणी करुनही आता दिवसाकाठी मुंबईत साधारण १५०० रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
मुंबईची लाईफलाईन सुरु करा; शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
तर राज्यभरात आज दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या २,६०८ ने वाढली. तर ६० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४७,१९० इतका झाला आहे. तर आज दिवसभरात ८२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत राज्यातील १३,४०४ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ४,८५,६२३ लोका होम क्वारंटाईन असून ३३,५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.