मुंबई : छगन भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळांची भेट घेऊ लागलेत. छगन भुजबळांवर सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भुजबळांची भेट घेतली. सोमवारी भुजबळ रुग्णालयातून बाहेर येणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळ आनंदीत असून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आल्याचं मुंडे यावेळी म्हणाले.
भुजबळांना सध्या गॅस्ट्रोलॉजी विभागात ठेवण्यात आलंय. पोटदुखीसोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा असे विविध त्रास भुजबळांना आहेत.