धनंजय मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, आमदार गोटेंचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडे यांची एक कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप होत असून त्यावरून मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे.

Updated: Mar 5, 2018, 12:15 PM IST
धनंजय मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, आमदार गोटेंचा खळबळजनक आरोप title=

मुंबई : धनंजय मुंडे यांची एक कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप होत असून त्यावरून मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे. यावर त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. आमदार अनिल गोटे यांनी मुंडेवर खळबळजनक आरोप केले आहेत.

माझ्या आवाजाची नक्कल

माझी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. माझ्या आवाजाची नक्कल केली गेली आहे. या ध्वनिफीतबाबत परळी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. असं होणं स्वाभाविक होते. सरकारकडून CD - CD बाबत वक्तव्य झाले होते. म्हणूनच की काय अशी ऑडियो क्लिप माझ्या आवाजाची वायरल झाली. पंतप्रधान किंवा कोणाबद्दल माझ्या जीवनात कधीच आक्षेपार्ह वक्तव्य केले जाऊ शकत नाही. कोणी खोडसाळपणा करत आहेत. सूडबुद्धीने माझ्या विरोधात सरकार कारस्थान करत आहे असा माझा अंदाज आहे.

काय आहे मुंडेंवर आरोप

माझ्याकडे एका कार्यकर्त्याने एक सीडी पाठविली असून त्यातील आवाज हा धंनजय मुंडे यांचा असून त्यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांची आई बहिण काढली आहे. यामध्ये जी भाषा वापरली आहे ती एका सुंस्कृत माणसाला शोभणारी नाही. ही सीडी तुम्हाला ऐकवित असताना होणार्‍या परिणामाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या अंगावर घेत आहे. हिंमत असेल तर मुंडेनी माझ्यावर खटला दाखल करावा. नाहीतर मी माझ्यापरीने पुढील कारवाई करणारच आहे, असे आमदार अनिल गोटे म्हणाले.