बनावट नोटा आणि दाऊद कनेक्शन? काय म्हणाले देवेंद्र फडवणीस

नोटाबंदीच्या काळात बनावट नोटांची हेराफेरी केल्याचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

Updated: Nov 10, 2021, 04:26 PM IST
बनावट नोटा आणि दाऊद कनेक्शन? काय म्हणाले देवेंद्र फडवणीस title=

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही नोटाबंदीच्या काळात बनावट नोटांची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. मलिक यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस यांच्या सत्ता काळात बनावट नोटांचे जाळे पसरले गेले. हे जाळे थेट दाऊदपर्यंत पोहोचले होते. देशात नोटा जप्त केल्या गेल्यात. नोटबंदीत एका वर्षात राज्यात बनावट नोटांचे जाळे पसरले होते. देशात नोटा जप्त केल्या जात होत्या. मात्र, राज्यात कारवाई केली गेली नाही. बनावट नोटांचे प्रकरण दाबले गेले. बनावट नोटांचे जाळे दाऊदपर्यंत आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला.

फडणवीस यांचं ट्विटद्वारे उत्तर

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 'मी खूप पूर्वी शिकलो आहे की डुकराशी कधीही कुस्ती करू नका, यामुळे तुमच्यावर घाण उडते आणि डुकराला तेच आवडते' असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांकडे कानाडोळा

नवाब मलिकांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी सपशेल कानाडोळा केला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत माधम्यांनी पुन्हा फडणवीस यांना विचारलं असता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांबद्दल माझं ट्विट पुरेसं आहे, असं म्हटलं आहे. तसंच आशिष शेलार यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे, यापेक्षा त्याला जास्त वजन नाहीए, त्यामुळे कशाला जास्त वजन द्यावं असं सांगत आरोपांना उत्तर देणं टाळलं.

आशिष शेलार काय बोलले होते

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणाऱ्यांना लंवगीही लावता आली नाही. त्यात त्यांचे हात पोळले. मलिक यांची हतबलता घालमेल पुन्हा दिसली. मलिक यांनाच ऑक्सिजन गरज लागणार आहे. मलिक यांनी जी नाव घेतली त्यातून फडणवीस यांचा संबंध थेट काहीच नाही, असे शेलार म्हणाले.

नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यांना हर्बल तंबाखू कमी पडत आहे का? जावाई म्हणणं खरं करण्यासाठी नवाबी पातळी गाठू नका. दोन एसआयटी चौकशी तपास सुरु का, मुद्दाम अल्पसंख्यक समाजातील एका नेत्याचे नाव पुढे याव यासाठी मलिक प्रयत्न करतात का, आदी सवाल  शेलार यांनी उपस्थित केले.