‘अलग मेरा ये रंग है’... अमृता फडणवीसांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Mar 10, 2020, 08:11 AM IST
‘अलग मेरा ये रंग है’... अमृता फडणवीसांचं हे नवं गाणं ऐकलंत का? title=

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबतच्या ट्विटरवॉरमुळे चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या वेगळ्या गायनशैलीचा ठसा उमटवणाऱ्या अमृता फडणवीस यांचे ‘अलग मेरा ये रंग है’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे गाणे प्रदर्शित झाले होते. यानंतर अवघ्या दोन दिवसांत सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

'कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही'

या गाण्याच्या माध्यमातून अॅसिड हल्ला पीडितांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री डोनल बिश्त हिच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांत चार लाखांहून अधिक वेळा हे गाणे पाहिले गेले आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्विटर सेन्सेशन अमृता फडणवीस केवळ तीन व्यक्तींनाच करतात फॉलो

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी अनेक कार्यक्रम आणि अल्बममध्ये गाणी गायली आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतही अमृता यांनी एक अल्बम रेकॉर्ड केला होता. मध्यंतरी सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या डान्सचा व्हीडिओही व्हायरल झाला होता. एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील ‘मै दिवानी, मै मस्तानी’ या गाण्यावर त्या डान्स करताना दिसल्या होत्या.