देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated: Nov 26, 2019, 02:55 PM IST
देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? title=

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3.30 मिनिटांनी पत्रकार परिषद घेत आहेत, त्यात ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे दिल्लीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच जेपी नड्डा यांची देखील बैठक पार पडतेय. विशेष म्हणजे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. 

या बैठकीत काय निर्णय होईल महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींविषयी ही बैठक आहे का, हे लवकरच दिसून येणार आहे. अजित पवार यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा माध्यमांवर सुरू आहे.

राज्यपालांकडे काही दिवसांपूर्वी संख्याबळाचा दावा करत, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे एकूण 162 पेक्षा जास्त आमदार कायम असल्याने, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं जात आहे.