Devendra Fadnavis यांच्यावर हक्कभंगाची कारवाई? प्रकरणी शिवसेना आमदाराची मागणी

विरोधीपक्ष नेते फडणवीसांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सेना आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. 

Updated: Mar 15, 2022, 10:40 AM IST
Devendra Fadnavis यांच्यावर हक्कभंगाची कारवाई?  प्रकरणी शिवसेना आमदाराची मागणी title=

मुंबई : विरोधीपक्ष नेते फडणवीसांवर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सेना आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे ताब्यात दिलेल्या पेन ड्राईव्हमधील व्हिडिओ अध्यक्षांच्या परवानगीविनाच व्हायरल केल्याप्रकरणी अशी कारवाई व्हावी असं काल जाधवांनी विधानसभेत म्हटलंय. 

मोहित खंबोज यांनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचा समवेतच लांबे फोटो ट्विट टाकले. आता एनीसपीच्या आदिती नलावडे यांनी भाजपाच्या नेत्या समवते फोटो ट्वीटर शेअर केले. वादग्र्सत लांबे यावरून पुन्हा एकदा आज विधीमंडळात वाद होणार त्या आधी एनसीपी भाजपात एकमेकांच्या विरोधात टीव्टवरून आरोप सुरू झाले.

देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभात राज्य सरकारवर आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. यासंदर्भातला दुसरा पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. यामुळे विधानसभेत खळबळ उडाली आहे. 

वक्फ बोर्डात थेट दाऊद संबंधित माणसं असून ज्यांनी बॉम्ब स्फोट केला त्याची नियुक्ती कशी असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. वक्फ बोर्ड सदस्य डॉ. मुदस्सिर लांबे आणि मोहम्मद अर्शद खान यांचे माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला. त्यांच्यातील्या संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्हच त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला.