12 ते 14 वयोगटाचं उद्यापासून लसीकरण...केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 15, 2022, 09:58 AM IST
12 ते 14 वयोगटाचं उद्यापासून लसीकरण...केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा title=

मुंबई : देशात आता 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी देखील कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी उद्यापासून खास मोहीम राबवली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे. तर ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी 'बूस्टर डोस'लाही मंजुरी देण्यात आली आहे. 

१६ मार्चपासून लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. 

एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. याआधी 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस घेण्यासाठी असलेले नियम शिथील करण्यात आले आहेत. (राज्यात तब्बल 80 हजार लशींचा कचरा...! साठेबाजीमुळे लशी expired?) 

देशभरात तब्बल १८० कोटी लस 

कोरोनाविरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोस देण्यात आले आहेत.

“मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! असं आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले आहेत.