दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन, देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना इशारा

जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला - देवेंद्र फडणवीस 

Updated: Nov 1, 2021, 10:56 AM IST
दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन, देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना इशारा  title=

मुंबई : दिवाळी आधी लवंगी फोडू मोठा आवाज करण्याचा नवाब मलिकांचा प्रयत्न आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी त्यांनी माझ्याशी बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फो़डेन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना इशारा दिला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी ट्विटरवर भाजप आणि ड्रग्स पेडलर यांचं नातं म्हणतं ट्विटर वॉरला सुरूवात केली. आज त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा जयदीप चंदूलाला राणा यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 'पैहचान कौन?' म्हणत नव्या वादाला सुरूवात केली आहे. 

नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. चार वर्षांपूर्वीचा फोटो आज सापडला. आज तो फोटो शेअर करून आरोप केले जात आहे. असं असेल तर एनसीपी पार्टी ड्रग्स माफीया पार्टी झाली पाहिजे, असं म्हणायला हवं. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. आता त्यांनी सुरूवात केलीय त्यामुळे त्याला अंतापर्यंत न्यावच लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना इशारा दिला आहे. 

नवाब मलिक यांचे जावई थेट ड्रग्स सापडले - पुर्ण एनसीपी पार्टी ड्रग्स म्हटले पाहिजे. तसेच फडणवीस शरद पवार यांना देखील नवाब मलिक अर्डरव्र्लड संबंधित पुरावे पाठवणार असल्याचं देखील या पत्रकार परिषदेत म्हणाले. जावई प्रकरणातून सुटावा व्हावी यासाठी मलिक सगळे करतात. 

नीरज गुंडे याबाबत खुलासा

नीरज गुंडे आमचे संबंधित आहे पण जरा एकदा सीएम यांना विचारले असते गुंडे यांच्या घरी मी जितका गेलो त्यापेक्षा जास्त सीएम ठाकरे नीरज गुंडे घरी गेले.  गुंडे हे एनसीपी घोटाळा बाहेर काढतात जर खोटे असेल तर केस टाका, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.