श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट; भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांना सापडला मोठा पुरावा

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस भाईंदरमध्ये धडकले आहेत. भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.  श्रद्धाच्या मोबाईलचा कसून शोध घेतला जात आहे. 

Updated: Nov 24, 2022, 07:11 PM IST
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात धक्कादायक अपडेट; भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांना सापडला मोठा पुरावा title=

Shraddha Murder Case, मुंबई : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात( Shraddha Walker murder case) धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मुंबईतील  भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांना (Delhi Police ) आरोपी आफताबविरोधात  मोठा पुरावा सापडला आहे. यामुळे आफताबविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात पोलिसांना यश आले आहे.  श्रद्धाच्या मोबाईलचा कसून शोध घेतला जातोय. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस भाईंदरमध्ये धडकले आहेत. भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.  श्रद्धाच्या मोबाईलचा कसून शोध घेतला जात आहे. 

भाईंदरच्या खाडीत मृतदेहाचे तुकडे केलेला चाकू सापडला

आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतल्या जंगलात फेकले होते. मात्र, पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आफताब भाईंदरमध्येही आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत. बुधवारी दुपारी साडे तीन वाजल्यापासून पोलिसांचे हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. या सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना भाईंदरच्या खाडीत मृतदेहाचे तुकडे केलेला चाकू सापडला आहे. पोलिसांच्या हाती लागलेला हा खूप मोठा पुरावा मानला जात आहे. 

आता पर्यंत पाच चाकू सापडले; करवताचा शोध सुरु

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आरोपी आफताबने एका मोठ्या करवतसह पाच चाकुंचा वापर केला होता. चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना ही माहिती दिली. पाच चाकु पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ये चाकू नियमीत वापरात येणाऱ्या किचन चाकूंपेक्षा वेगळे आहेत. पाच ते सहा इंच लांब असलेले हे चाकू खूप धारधार आहेत.  हे पाचही चाकू पोलिसांनी तपासासाठी पाठवले आहेत. मात्र, करवत अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. 

श्रद्धाचे 35 तुकडे केले

श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे  35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात(Mehrauli Forest) फेकत होता.  दिल्ली पोलिसांची 200 जणांची सर्वात मोठी टीम श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत श्रद्धाचा जबडा तसंच 18 हाडं सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.