Deepali Sayed : दीपाली सय्यद यांनी सस्पेन्स वाढवला, म्हणाल्या - एक दिवस माझाही गट...

Politics News : शिवसेनेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) बंडानंतर उभी फूट पडली. शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ( Uddhav Thackeray Group) सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayed ) अचनाक गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

Updated: Oct 20, 2022, 12:47 PM IST
Deepali Sayed : दीपाली सय्यद यांनी सस्पेन्स वाढवला, म्हणाल्या - एक दिवस माझाही गट... title=
Deepali Sayed On Shiv Sena ( Image Source : Facebook @ Deepali Sayed)

Maharashtra Politics News : शिवसेनेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) बंडानंतर उभी फूट पडली. शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ( Uddhav Thackeray Group) सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayed ) अचनाक गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता दीपाली सय्यद यांनीच सस्पेन्स वाढवला आहे. (Deepali Sayed On Shiv Sena) त्यांनी आपण ठाकरे गटाच्या की शिंदे गटाच्या यावर मौन बाळगले आहे. परंतु एक दिवस माझाही गट असेल, असे सांगत त्यांनी राजकीय गुगली टाकली आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) रणरागिणी  म्हणजे  दीपाली सय्यद (Deepali Sayed) अशी त्यांची ओळख. मात्र, सध्या त्या राजकारणापासून अलिप्त दिसून दिसून येत आहेत. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या  बंडानंतर त्यांनी उदधव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने जोरदार खिंड लढवली होती, पण अचानक त्या राजकीय पटलावरुन गायब झाल्या आहेत.  

दरम्यान, राजकीय वर्तुळात दीपाली सय्यद या शिंदे गटात जाणार? अशी चर्चाही रंगली आहे. त्यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. हा माझा गट, हा तुझा गट असे सध्या राजकारणात सुरु आहे. एक दिवस माझाही गट असेल, असे म्हणत दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी उत्सुकता वाढवली आहे. तुम्ही सध्या कोणाच्या बाजूने त्या म्हणाल्या शिवसेना कोणाची हे अजून ठरलले नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. भविष्यात तुम्हाला माझी भूमिका कळेलच, असे सूचक वक्तव्य केले. त्याआधी त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केले होते. जरी दोन दसरा मेळावा असले तरी बाळासाहेब एकच आहेत. जे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जातील त्यांच्या डोक्यावर बाळासाहेबांचा हात... अशी पोस्ट करत दोन्ही दसरा मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटात नव्याने प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांना उपनेते पद देण्यात आले. त्यांनी अगदी कमी काळावधीत आपली एक वेगळी छाप पाडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या एक रणरागिणी म्हणून समोर आल्या आहेत. मात्र  आतापर्यंत सेलिब्रेटी रणरागिणी म्हणून शिवसेना ठाकरे गटात वावरणाऱ्या दीपाली सय्यद नेमक्या कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.