जागतिक बॅंकेच्या सूचीत मुंबई शहराची घसरण

 मुंबई शहराची घसरण झाली आहे. 

Updated: Nov 1, 2018, 10:56 PM IST
जागतिक बॅंकेच्या सूचीत मुंबई शहराची घसरण title=

मुंबई : जागतिक बँकेकडून दरवर्षी जाहीर करण्यात य़ेणाऱ्या व्यवसाय सुलभतेच्या सूचीमध्ये भारतानं १०० व्या स्थानावरुन ७७ व्या स्थानावर झेप घेतलीय.  भारतातील शहरनिहाय यादीही जाहीर झाली आहे. त्याच बांधकामांच्या निकषांवर मुंबईचा सतरावा म्हणजे शेवटचा क्रमांक आहे. मुंबईत बांधकाम करणे सर्वात कठीण बनले आहे. त्यामुळे मुंबई शहराची घसरण झाली आहे.

भारताची उसळी 

जागतिक बँकेकडून दरवर्षी जाहीर करण्यात य़ेणाऱ्या व्यवसाय सुलभतेच्या सूचीमध्ये भारतानं चांगली कामगिरी करत उसळी घेतलीये. देशातील शहरांच्या यादीवर नजर टाकली असता अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्यात.

डाव्या विचारांची सरकारे असणाऱ्या राज्यात उद्योग उभारणी कठीण असल्याचं वास्तव समोर आलंय.

कोलकाता शहरात उद्योग उभारणं सर्वात दुरापास्त असल्याची स्थिती आहे. तर डाव्यांचं सरकार असलेल्या केरळमधील कोची शहरही व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत तळाशी आहे.

१७ शहरांच्या यादीत कोची शहर शेवटून दुसरं आहे.