मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंत्यसंस्काराच्या गोष्टी करणा-यांनी आधी सत्ता सोडायला हवी होती अशी नेमकी प्रतिक्रिया, महागाईच्या कारणावरुन शिवसेनेनं पुकारलेल्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलीय. महागाईमुळे जनतेला होणा-या त्रासात शिवसेनाही वाटेकरी असल्याची टीका, धनंजय मुंडेंनी केलीय.
सत्तेत एकत्र रहायचं आणि सरकारविरोधातच आंदोलन करायचं, हा शिवसेनेचा निर्लज्जपणा असल्याचं मुंडे म्हणाले. नरेंद्र मोदींविरोधात समाज माध्यमांवर काही लिहिल्यास पोलीस तातडीनं लिहिणा-याला नोटीस पाठवतात.
आता सत्तेत बसलेल्यांनीच मोदींविरोधात घोषणा दिल्यात. यावर मुख्यमंत्र्यांचं गृह विभाग शिवसेनेला नोटीस पाठवणार का, असा सवालही धनंजय मुंडेंनी यानिमित्तानं केलाय.