देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : तुम्ही कॉर्पोरेट ऑफीसमध्ये काम करत असाल किंवा अगदी रस्त्यावर मोल मजुरीचं काम करत असाल... तुम्ही सुपरस्टार असाल... किंवा अगदी गल्ली बोळातले खेळाडू असाल... सगळ्यांना एका टपरीच्या छताखाली आणतो तो म्हणजे 'टपरीवरचा चहा'... कामाचा थकवा दूर करण्यासाठी, गॉसिंपींगसाठी किंवा अगदी विरंगुळा म्हणून तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा कधी कधी त्याही पेक्षा जास्त चहा घेता. मात्र आता हाच चहा तुमच्या खिशालाही कात्री देणार आहे.
टपरीवर मिळणारा कटिंग चहा म्हणजे अनेकांचा विक पाईंट... आता हाच कटिंग चहा तुमच्या खिशालाही ताण देणार आहे. कारण, एक ते दोन रुपयांनी हा चहा महाग होणार आहे... 'टी अँड कॉफी असोसिएशन'नं दर वाढीचा निर्णय घेतलाय.
गॅस, दूध, साखरेचे भाव वाढल्यानं चहा विक्रेत्यांनाही भाववाढ करावी लागत आहे. सध्या कटिंग चहा ६ ते ७ रुपयांना मिळतो. भाववाढीनंतर हाच कटिंग चहा ८ ते ९ रुपयांना मिळणार आहे.
मात्र, चहाप्रेमींचा विक पाईंट असलेला चहा भाववाढ झाली तरी प्यावाच लागणार अशी प्रतिक्रिया चहा प्रेमी व्यक्त करताना दिसतायत.
सद्यस्थितीतली महागाई किती वाढली? यावर कटिंग चहा पित पित अनेकदा चर्चा रंगल्यात... म्हणूनच की काय आता कटिंग चहाही महाग होतोय.