पालकांनो सावधान, मुंबईतला कटऑफचा आकडा कमालीचा वाढण्याची शक्यता

दहावी एसएससी बोर्डाचा निकाल तर जाहीर झाला पण आता खरी लढाई असणार आहे ती कॉलेज प्रवेशाची. मुंबईतल्या टॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या विद्यार्थ्यांची इच्छा असते. 

Updated: Jun 13, 2017, 08:43 PM IST
पालकांनो सावधान, मुंबईतला कटऑफचा आकडा कमालीचा वाढण्याची शक्यता title=

मुंबई : दहावी एसएससी बोर्डाचा निकाल तर जाहीर झाला पण आता खरी लढाई असणार आहे ती कॉलेज प्रवेशाची. मुंबईतल्या टॉप कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या विद्यार्थ्यांची इच्छा असते. 

CBSE, ICSE  आणि एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झालाय. मुंबईत प्रवेशासाठी केवळ २ लाख ८० हजार जागा उपलब्ध आहेत. तर एसएससी बोर्डात पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८ हजार आहे. त्यात CBSE आणि ICSE बोर्डाच्या शेकडो विद्यार्थ्यांची भरच पडणार आहे. 

त्यामुळे मुंबईत उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात जास्त आहे. त्याचा परिणाम कॉलेजेसचा कटऑफ मोठा होण्यावर होणार आहे.