मुंबई : गुरुवारी झालेल्या सीएसएमटी पुल दुर्घटना प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. २२ मार्चला या दुर्घटनेप्रकरणी सुनावणी होणार असून एलफिन्स्टन पुल दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेत गुरुवारच्या दुर्घटनेचा मुद्दा वाढवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. मुंबईत सतत होणाऱ्या पुल दुर्घटनांप्रकरणी रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या मुख्य याचिकेत करण्यात आली आहे. सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदार मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाच्या दुर्घटनेवरून ब्लेमगेम सुरू झाला असून रेल्वेकडून दुरुस्तीची परवानगी मिळाली नसल्याचा महापौरांनी आरोप केला आहे तर हा पूल महापालिकेचा असल्याचा दावा रेल्वेनं केला आहे.
महापालिकेनं रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचे अवशेष तातडीनं हलवलेत. तसंच पुलाचा धोकादायक स्लॅब देखील पाडण्यात आला. अजूनही या ठिकाणची वाहतूक बंद आहे. महापालिकेनं रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचे अवशेष तातडीनं हलवलेत. तसंच पुलाचा धोकादायक स्लॅब देखील पाडण्यात आला. अजूनही या ठिकाणची वाहतूक बंद आहे. सीएसएमटी पूर्ल दुर्घटना प्रकरणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले. 24 तासांत रिपोर्ट देण्याचं आदेश देण्यात आले आहेत. ऑडिट योग्य झालं होतं का? दुरुस्ती सुचवली होती, ती करण्यात आली होती का? जर झाली नसेल का झाली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे अहवालात असली पाहिजते असा आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
Mumbai foot over bridge collapse: BMC (Brihanmumbai Municipal Corporation) Commissioner Ajoy Mehta orders Vigilance Department to submit a preliminary report within 24 hours, identifying the Municipal staff responsible & responsibility of structural auditor for this incident. https://t.co/UopcrPB1ot
— ANI (@ANI) March 15, 2019