अभिनेत्री राखी सावंतला मोठा धक्का, सख्ख्या भावाला अटक... थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला मुंबईतल्या ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. एका उद्योगपतीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Updated: May 9, 2023, 05:49 PM IST
अभिनेत्री राखी सावंतला मोठा धक्का, सख्ख्या भावाला अटक... थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला (Actress Rakhi Sawant) मोठा धक्का बसला आहे. राखी सावंतच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. राकेश सावंत (Rakesh Sawant) असं राखीच्या भावाचं नाव असून एका उद्योगपतीच्या तक्रारीनंतर मुंबईतल्या ओशिवारा पोलिसांनी (Mumbai Oshiwara Police) ही कारवाई केली आहे. राकेश सावंतवर चेक बाऊंसचा (Cheq Bounce Case) आरोप एका उद्योगपतीने केला आहे. हे प्रकरण तीन वर्ष जून असल्याची माहिती आहे. 

चेक बाऊंस प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी उद्योगपतीला पैसे परत करण्याच्या अटीवर कोर्टाने राकेश सावंतला जामीन दिला. पण अनेक दिवस उलटल्यानंतरही राकेश सावंतने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे उद्योगपतीने कोर्टात पुन्हा याचिका दाखल केली. यावर कोर्टाने राकेश सावंतविरुद्ध अटक वॉरंट जाही केलं. आदेशानंतर पोलिसांनी राकेश सावंतला अटक करत कोर्टासमोर उभं केलं. यावेळी कोर्टाने राकेश सावंतला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

राखीच्या मागे भक्कम उभा राहिला राकेश
अभिनेत्री राखी सावंत बॉलिवूडमध्ये 'ड्रामा क्वीन' नावाने ओळखली जाते. आपलं रोखठोक वक्तव्य आणि कपड्यांवरुन राखी नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी एक्स पती आदिल खान आणि राखी सावंतचं प्रकरण चांगलंच गाजलं. राखीने आदिल खानवर गंभीर आरोप केले होते. आदिल मारहाण करतो तसंच त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप राखीने केले होते. यावेळी राकेश सावंत आपल्या बहिणीच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला होता. 

राकेशचे आदिलवर आरोप
आईचं निधन झाल्यावर राखीवर दुख:चा डोंगर कोसळला होता. संपूर्ण कुटुंब दु:खात होतं. पण आदिलला कसलची फिकर नव्हती त्याने राखीचा छळ करत तिला मारहाण केल्याचा आरोप राकेशने केला होता. राखीच्या पैशांवर आदिलने दुबईत घर घेतल्याचा आरोपही राकेशने केला आहे. मीडियासमोर राखीबरोबरच राकेश सांवतही आदिल विरोधात वक्तव्य करतान दिसला होता.

राखी सावंतलाही करण्यात आली होती अटक
काही महिन्यापूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शर्लिनच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी राखी सावंतविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर जानेवारी महिन्यात राखीला अटक करण्यात आली होती. याबाबत शर्लिन चोप्राने ट्विटरवरुन माहिती दिली होती. आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे.  राखी सावंतचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, असं शर्लिन चोप्राने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.