मुंबई : सुंदर टाच ही नेहमी सुंदर दिसते, याला पुरूष किंवा महिला असा अपवाद नाही. १५ दिवसांच्या आत तुम्हाला तुमची भेगाळलेली टाच सुंदर करायची असेल. तर काही सोपे उपाय आहेत. कोरड्या आणि भेगाळलेल्या टाचांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे.
१) आरामदायक पादत्राणे वापरा, ज्यात पायांना जास्त जागा असेल. कडक आणि अरूंद पादत्राणामुळे वेदना वाढू शकते.
२) पाय स्वच्छ करण्यासाठी चांगला अॅन्टीबायोटिक साबण वापरा, यामुळे जीवाणू मारता येतात, आणि संक्रमण होत नाही.
३) कोरड्या भेगांसाठी माईश्चरायझरचा जरूर वापर करा, ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर स्वच्छ मोजे वापरा.
४) टाचांची कोरडी कातडी कैचीने वैगरे कापण्याचा प्रयत्न करू नका, ते घातक ठरू शकते, संक्रमण वाढण्याचा धोकाही.
५) आपल्या पायांना, टाचांना लिंबूने घासा, काही तास आठवड्यातून एकदा असं केलं, तर झटपट सुधारणा होईल.
६) दररोज आठ ते दहा ग्लास पाण्याचं सेवन करा, याचाही चांगला परिणाम टाचांवर दिसून येईल.
७) त्वचा जास्तच कोरडी असेल, तर घरगुती उपाय करूनही काही होत नसेल, तर त्वरीत डॉक्टरांना भेटा.