मोठी बातमी: कल्याण-डोंबिवलीत आणखी १२ जणांना कोरोनाची लागण

कल्याण आणि डोंबिवली परिसरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ इतका झाला आहे. 

Updated: Apr 22, 2020, 05:17 PM IST
मोठी बातमी: कल्याण-डोंबिवलीत आणखी १२ जणांना कोरोनाची लागण title=

ठाणे: एकीकडे मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असताना कल्याण-डोंबिवली परिसरातील रुग्णांचा आकडाही आता शंभरच्या जवळ येऊन पोहोचला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात बुधवारी कोरोनाचे आणखी १२ रुग्ण मिळाले. यापैकी तीन जण कल्याण पूर्व, एकजण आंबिवली, एकजण डोंबिवली पश्चिम तर डोंबिवली पूर्वेतील सात जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता कल्याण आणि डोंबिवली परिसरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ इतका झाला आहे. 

सरकारचा मोठा निर्णय; आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात टाकणार

या परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असतानाही नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, तरीही या भागात दररोज नवे रुग्ण मिळत आहेत. 

जगात २४ लाखांवर कोरोनाबाधित; मृतांचा आकडा १ लाख ७० हजार पार

याशिवाय, ठाणे परिसरात बुधवारी तीन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला. या तिघांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु होते. या तिघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणे बाकी होते. मात्र, त्यापूर्वीचा या तिघांचा मृत्यू झाला.

नवी मुंबईत IT कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांना करोना
महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एक आयटी कंपनीतील तब्बल १९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. सर्व बाधितांना 'कोविड १९' बाधितांसाठी राखीव असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.