मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना पाहा धारावीत काय आहे स्थिती?

Coronavirus in Dharavi : एकीकडे मुंबईत कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून (Dharavi) मात्र दिलासादायक बातमी आहे.  

Updated: Sep 4, 2021, 01:34 PM IST
मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना पाहा धारावीत काय आहे स्थिती? title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus in Dharavi : एकीकडे मुंबईत कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून (Dharavi) मात्र दिलासादायक बातमी आहे. धारावीत कोरोना लसीकरणही लाखांच्या घरात पोहोचले आहे. धारावीची कोरोना विरोधात आघाडी कायम दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत 16 वेळा एकही रूग्ण (COVID19 cases) आढळून आलेला नाही. दादर, माहिममध्येही रूग्णसंख्येतही घट दिसून येत आहे.( Dharavi reports no new Covid-19 cases)

धारावीत (Dharavi) जसलोक रुग्णालय आणि सिटी बँकेच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. हे लसीकरण लाखांच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे धारावीची कोरोनाविरोधात (Coronavirus testing in Dharavi) आघाडी कायम राखण्यात यश येत आहे. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 16 वेळा एकही रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नसल्याची विशेषबाब पुढे आली आहे. त्याचवेळी गर्दीचे ठिकाण दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढताना दिसून येत आहे. गेल्या 10 दिवसांत रोजची रूग्णसंख्या 400 पार झाली आहे. काही निर्बंध शिथिल केल्यामुळे रूग्णवाढ वेगाने होत  असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनावाढीमुळे सील केलेल्या इमारतींची संख्याही दुप्पट झाली आहे.

त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या व प्रतिबंधित मजल्यांची संख्याही वाढू लागली आहे. १८ ऑगस्टला मुंबईत २४ इमारती प्रतिबंधित होत्या, तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ही संख्या ४८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या इमारतींमधील १२०० हून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

तर महाराष्ट्र राज्यात 3 सप्टेंबर रोजी 4313 रुग्ण सापडले तर 3,360 रुग्ण बरे झालेत. दुसरीकडे देशातही (India) कोरोना रुग्णवाढ दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 24 तासात 42 हजार 618 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. 36 हजारांहून अधिक जण बरे होऊन घरी परतलेत. तर 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशातल्या अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 4 हजारांच्या पुढे गेला आहे.