कोरोनाचे संकट : मुंबई पालिकेच्या हेल्पलाईनला मोठा प्रतिसाद, केले जातेय शंकांचे निरसन

कोरोनासंदर्भात मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाईनला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद.

Updated: Mar 27, 2020, 02:46 PM IST
कोरोनाचे संकट : मुंबई पालिकेच्या हेल्पलाईनला मोठा प्रतिसाद, केले जातेय शंकांचे निरसन title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनासंदर्भात मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाईनला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी दीड हजार कॉल्स या हेल्पलाईनवर येत असून त्यांच्या शंकांचे निरासन केले जात आहे. त्याचसोबत कोरोनाची लक्षणे असल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळवण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जात आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे.

कोरोना आजारासंदर्भातील हेल्पलाईनवर शंकांचे निरासन तर केले जात आहेच, शिवाय कोरोनाची लक्षणे असतील तर तात्काळ आरोग्य यंत्रणेला कळविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यासाठी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नायर रूग्णालयातही हेल्पलाईन सेंटर सुरु आहे.

दरम्यान, मुंबईत झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचा लोकांना फायदा झाल्याचे दिसत आहे. त्यानुसार आता नागरिकांना घरातच कोरोना टेस्ट करवून घेणे शक्य होईल. केवळ होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना ही सोय उपलब्ध असेल. एखाद्या होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली तर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घरी जाऊन त्या रुग्णाचे नमुने (सॅम्पल्स) गोळा करतील. यानंतर हे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात येतील.