मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात सगळ्यांचे आभार मानले आहेत.नागरिकांनी घरी राहून खूप चांगला पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याची देखील नोंद उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. घराघरात ACP (अँटी कोरोना पोलिसमन) असा उपक्रम राबवला जात आहे. घराघरात कोरोनाशी लढण्यासाठी आता लहान मुलं देखील पुढे सरसावले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
ACP anti corona police pic.twitter.com/4LgHsSDS4o
— Vishwas Nangre Patil (@vishwasnp) April 14, 2020
विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ विश्वास नांगरे पाटील कामावरून घरी आले. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना दारातच अडवलं. 'डॅडी, तुम्ही बाहेर सीपी असता पण घरात आम्ही अँटी कोरोना पोलीस' आहोत.' असं म्हणतं त्यांना काही गाईडलाईन फॉलो करायला सांगितल्या. यामध्ये पाटील यांना मोबाईल स्टॅनिटाईज करायला सांगितलं. एवढंच नव्हे तर थेट बाथरूममध्ये जाण्यास सांगितलं. (पीपीई किटपासून प्रत्येक गोष्ट डॉक्टरांना पुरवू- मुख्यमंत्री)
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याच व्हिडिओचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. अशा पद्धतीने ACP टीम प्रत्येकाच्या घरी असावी असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सगळ्यांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळावेत अस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. (Coronavirus : मुख्यमंत्र्यांनी हेल्पलाईन करता शेअर केले दोन क्रमांक)
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी ACP ही मोहिम सुरू केली. या मोहिमेचं सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.