झी 24 तासवर दुपारी 2 वाजता 'बालक-पालक परिषद' आयोजित

मानसिक ताण आणि असणाऱ्या समस्या या सर्व गोष्टींवर चर्चा केली जाणार

Updated: May 28, 2021, 01:06 PM IST
झी 24 तासवर दुपारी 2 वाजता 'बालक-पालक परिषद' आयोजित  title=

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लहान मुलांना वेढीस धरलं आहे. कोरोनानंतर बालकांमध्ये एमआसएस सी सारखा आजार पुढे आला आहे. मुलांना कोरोना झाल्यानंतर कोरोनानंतरची ही गुंतागुंत आहे, यातून  मुलं गंभीर आजारी पडू शकतात असं अभ्यासात पुढं आलं आहे.

कोरोनामुळे पालक आणि बालक या दोघांवरही खूप मानसिक ताण आला आहे. हाच ताण कमी कसा करायचा यासाठी झी चोवीस तासने 'बालक-पालक परिषद' आयोजित केली आहे. मानसिक ताण आणि असणाऱ्या समस्या या सर्व गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. 

येणाऱ्या अडचणी किंवा समस्यांचं योग्य नियोजन करून आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं विकसित करण्यासाठी ही खास बालक-पालक परिषद आयोजित केली आहे. आज शुक्रवारी 28 मे रोजी दुपारी 2 वाजता पाहायला विसरू नका.

या 'बालक-पालक परिषद'मध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख, मानसशास्त्रज्ञ डॉ. सुषमा भोसले, अभिनेता, योग प्रशिक्षक बिजय आनंद आणि अभिनेत्री गिजीका ओक-गोडबोले यांचा सहभाग आहे. 

ही परिषद तुम्ही 'झी 24 तास' वाहिनीवर आणि '24 तास.कॉम'च्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहू शकतो.