मुंबई : कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा फैलाव जास्त होत असल्याने लॉकडाऊनही वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत. किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. त्यामुळे राज्यात अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. आता राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग, कारखाने सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्यात. याबाबत राज्यातल्या उद्योजकांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
BreakingNews । राज्यात मुंबई, पुणे वगळता इतरत्र उद्योग, कारखाने सुरु करण्याच्या हालचाली सुरु, याबाबत राज्यातल्या उद्योजकांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.#CoronaVirus @CMOMaharashtra @ashish_jadhao pic.twitter.com/ESJupfOzo2
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 14, 2020
राज्याच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक क्षेत्राचा वाटा ३० पूर्णांक ४ टक्के एवढा आहे. त्या तुलनेत कृषी क्षेत्राचा वाटा ९ पूर्णांक ९ टक्के आहे. राज्यात तब्बल १४ हजारांवर मोठे उद्योग तर ४ लाखांहून अधिक लघू मध्यम उद्योग असल्याने अर्थव्यवस्था ढासळू नये यासाठी उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होते आहे.
मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव
करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.#COVID19@CMOMaharashtra @OfficeofUT@AUThackeray@iAditiTatkare@AjitPawarSpeaks@rajeshtope11@AmitV_Deshmukh@bb_thorat@MahaDGIPR@InfoAurangabad— Subhash Desai (@Subhash_Desai) April 13, 2020
दरम्यान, राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३५२ नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा २ हजार ३३४ वर गेलाय. तर गेल्या २४ तासांत ११ जणांचा बळी गेला असून मृतांचा आकडा १६० वर गेलाय. एकट्या मुंबईत २४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत १७०३ जणांना कोरोनाची लागण झालीय. तर मुंबईतल्या मृतांचा आकडा १०१वर पोहोचला आहे.