Vaccination : केंद्राने जबाबदारी ढकलली तरी आम्ही सक्षम आहोत - बाळासाहेब थोरात

यापूर्वीचे सर्व लसीकरण मोफत झाली आहेत. आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत.

Updated: Apr 29, 2021, 02:44 PM IST
Vaccination : केंद्राने जबाबदारी ढकलली तरी आम्ही सक्षम आहोत - बाळासाहेब थोरात title=
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ( Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना मृत्युच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात लसीकरणावर (Corona Vaccination) भर देण्यात येत आहे. लसीकरणाबाबत पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर खापर फोडले आहे. काँग्रेस कोरोनाविरोधी लढ्यात काम करेल. आधी लसीकरण  लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे सर्व लसीकरण मोफत झाली आहेत. आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. लसीकरणाची जबाबदारी केंद्राची असली तरी जबाबदारी आमच्यावर ढकलली आहे. परंतु आम्ही ही जबाबदारी समर्थपणे पाळू, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात येत आहे. आता 18 + लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची जबाबदारी केंद्राची असली तरी जबाबदारी आमच्यावर ढकलली आहे. परंतु आम्ही ही जबाबदारी समर्थपणे पाळू. लसीकरणासाठी गर्दी झाल्यास कोरोना वाढवणारी ठरु शकते. त्यामुळे तसे नियोजन करणे आवश्यक आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

आधी लसीकरण  लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. या लसीकरणासाठी मोठा खर्च येत आहे. मी माझ्यावतीने मदत करत आहे.  मी एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री रिलीफ फंडात देत आहे. आमच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे मानधनही देत आहोत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसतर्फे आम्ही 5 लाख देत आहोत. इतरांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले. आपण सक्षम आहोत, त्यांनी पाच लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा. असे अभियान जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील राबवत आहेत. आमच्या अमृत उद्योगाचे 5 हजार कर्मचारी आहेत. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही सीएम रिलीफ फंडात देणार आहोत, अशी माहिती थोरात यांनी दिली.

45 वर्षावरील व्यक्तींचे 25 टक्के लसीकरण झालेले. नवीन कर किंवा अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पुण्यात जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.